Saturday, March 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबादमध्ये प्रवक्ता इंग्लिश अकॅडमीच्या नव्या शाखेचा शुभारंभ ; विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने इंग्लिश...

नशिराबादमध्ये प्रवक्ता इंग्लिश अकॅडमीच्या नव्या शाखेचा शुभारंभ ; विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग प्रशिक्षणाची संधी!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील श्रवण कॉम्प्युटर्स अँड क्लासेस येथे प्रवक्ता इंग्लिश अकॅडमीच्या नव्या शाखेचा शानदार शुभारंभ उत्साहात करण्यात आला. श्रवण कॉम्प्युटर्स अँड क्लासेसचे संचालक हरीश पाटील व संचालिका वर्षा पाटील यांच्या पुढाकारातून ही शाखा सुरू करण्यात आली असून श्रवण कॉम्प्युटर्स आता प्रवक्ता इंग्लिश अकॅडमीचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत झाले आहे. या उपक्रमामुळे नशिराबाद शहरातील विद्यार्थी व तरुणांना आधुनिक पद्धतीने इंग्लिश स्पीकिंगचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवक्ता इंग्लिश अकॅडमीचे संस्थापक प्रा. रवींद्र पाटील उपस्थित होते. तसेच नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज महाजन, प्रवक्ता अकॅडमीचे स्टेट हेड प्रा. शशिकांत माळी, मार्केटिंग हेड प्रा. विजय पाटील, जळगाव जिल्हा प्रमुख सागर पाटील तसेच मालेगाव येथील प्रा. सैंदाणे सर हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अकॅडमीच्या नव्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नशिराबाद शहरातील विद्यार्थी, पालक तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्लिश भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी इंग्लिश संवादकौशल्य आवश्यक झाले आहे. ग्रामीण व छोट्या शहरांतील विद्यार्थ्यांना मातृभाषेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकता यावे, या उद्देशाने प्रवक्ता इंग्लिश अकॅडमीमार्फत विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी बोलताना अकॅडमीचे संस्थापक प्रा. रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या काळात केवळ इंग्लिश वाचणे किंवा लिहिणे पुरेसे नाही, तर आत्मविश्वासाने इंग्लिश बोलता येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी इंग्लिशची भीती न बाळगता ते संवादाचे प्रभावी साधन म्हणून स्वीकारले पाहिजे.”

नशिराबाद शहरात सुरू झालेल्या या इंग्लिश स्पीकिंग अकॅडमीमुळे विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषेचे कौशल्य विकसित करण्यासाठी मोठी मदत होणार असून भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींसाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या