प्रशासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला मिळाला भरघोस प्रतिसाद!
नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज व समाधान शिबिराचे आयोजन १२ जून रोजी नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जिल्ह्यातील २७ शासकीय विभागांच्या स्टॉल्सद्वारे विविध शासकीय योजनांचे लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
शिबिरात प्रमुख सहभाग असलेले विभाग:
कृषी विभाग, तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय, आरोग्य विभाग, नगरपरिषद, अग्निशमन दल, महिला बचत गट, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, आधार नोंदणी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, मोफत आरोग्य तपासणी व इतर अनेक विभागांनी शिबिरात सहभाग घेतला.शिबिरामध्ये अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड, आर्थिक मदत व शासकीय योजनांचे अनुदान वितरित करण्यात आले. शिबिरास नशिराबादसह परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात उपस्थित असलेले मान्यवर:
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, नगरपरिषद मुख्याधिकारी, माजी जि.प. सदस्य लालचंद पाटील, न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन योगेश पाटील, विकास धनगर, विकास पाटील, कीर्तिकांत चौबे, पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील व मोनाली लंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे व ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.
नशिराबाद समाधान शिबिर लाभार्थी संख्या: