Wednesday, February 25, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात आणि भक्तिभावात साजरी : नशिराबाद परीट समाजातर्फे महाप्रसाद...दीपप्रज्वलन...

संत गाडगेबाबा जयंती उत्साहात आणि भक्तिभावात साजरी : नशिराबाद परीट समाजातर्फे महाप्रसाद…दीपप्रज्वलन व भजन संध्या ; मान्यवरांची उपस्थिती

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-समाजप्रबोधन, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देणारे थोर संत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद परीट समाजातर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे भक्तिभावपूर्ण आयोजन करण्यात आले. सकाळी आयोजित महाप्रसादाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर सायंकाळी दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि भजन संध्येमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. धीरज सैतवाल यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक चेतन सपकाळे यांनी मांडले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी किशोर पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील आणि उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती पंकज महाजन यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत समाजात स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक एकतेचा संदेश दृढ करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास परीट समाज प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ), माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती पंकज महाजन, आरोग्य व स्वच्छता सभापती चेतन बऱ्हाटे, वित्त व नियोजन सभापती मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, परीट समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते सुदाम धोबी व कैलास नेरकर, सामाजिक कार्यकर्ता विनोद रंधे, विकास धनगर, निलेश पिंगळे, सचिन हिंगणे, निलेश खुंटे, राजेश कोष्टी, ईश्वर सपकाळे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, स्वयंशोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नशिराबाद परीट समाजाचे अध्यक्ष गणेश सपकाळे, उपाध्यक्ष कैलास सपकाळे, सचिव सागर सोनवणे तसेच सदस्य महेश सपकाळे, अनिल सपकाळे, विकास सुरळकर, चेतन सपकाळे, राहुल धोबी, यश सपकाळे, रमेश सपकाळे, किरण सपकाळे, पवन सपकाळे, संतोष रोकडे, राहुल सपकाळे, अनिल रोकडे, सचिन रोकडे, प्रदीप वाघ, संतोष वाघ, सोनू सपके, योगेश सपके, युवराज सोनवणे आदींनी परिश्रमपूर्वक नियोजन करून उत्कृष्ट आयोजन केले.

या कार्यक्रमातून संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करत समाजप्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक व समाजबांधव उपस्थित राहिल्याने जयंती सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या