Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावनशिराबादमध्ये संत सावता महाराज संजीवन समाधी दिन भक्तिभावात साजरा

नशिराबादमध्ये संत सावता महाराज संजीवन समाधी दिन भक्तिभावात साजरा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- “कर्म हीच पूजा” हे तत्त्वज्ञान देणारे वारकरी संप्रदायाचे थोर संत, श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त नशिराबाद येथे आज दिंडी व भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.सकाळी महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक पूजन रोहिणी व प्रशांत बंडू माळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर समस्त माळी पंचचे सेक्रेटरी पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला.

ही दिंडी महादेव मंदिर येथून सुरू होऊन फुले चौक, मेनरोड, नाईक वाडा मार्गे संत सावता मंदिराजवळ सांगता करण्यात आली. दरम्यान, गावातील भाविकांनी पुष्पवृष्टी करीत दिंडीचे स्वागत केले.दिंडी नंतर काल्याचे भजन पार पडले. आरती सौ. रेखा तुषार रघुनाथ माळी यांच्या हस्ते झाली. नंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुनिलशास्त्री महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी माजी सरपंच विकास भाऊ पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, माजी सरपंच पंकजभाऊ महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकासभाऊ धनगर, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे, माजी सदस्य नामदेव माळी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी हभप पंकज महाराज मानमोडीकर, प्रमोद महाराज मानमोडीकर, विजय महाराज मोंढाळा, तसेच सुरेश माळी, दगा महाजन, सुधाकर महाजन, तुळशीराम जगताप, धनराज पाटील, दत्तू फेगडे, अनिल मुळे, मधुकर महाजन, मोहन खारे, गणेश माळी आदींसह भजनी मंडळ व महिला मंडळ सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष संदीप पाटील, सहसचिव पंढरीनाथ पाटील, प्रवीण महाजन, अशोक पवार, संतोष पवार, होमराज महाजन, भगवान पाटील, विकास पाटील, राकेश माळी, दयाराम माळी, शांताराम माळी, जगन पाटील, गणेश पाटील, नागराज महाजन, तेजस माळी, पत्रकार सुनिल महाजन, संदीप जगताप, निलेश महाजन, सुपडू चौधरी व इतर अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

स्वयंपाक व्यवस्था प्रभाकर पवार, बाबूलाल महाजन, चंदू फेगडे, सुधीर महाजन, काशिनाथ महाजन यांच्याकडे होती.कार्यक्रमाची सांगता काल्याचे भजन व आरतीने करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या