Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबाद येथे संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

नशिराबाद येथे संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील वरची आळी भागातील श्री संत सेना महाराज मंदिरात संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक श्री. सचिन आलोकार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. चेतन गालफाडे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली. यानंतर पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे पूजन श्री. बाळू निंबाळकर यांनी केले.

या सोहळ्याच्या निमित्ताने ह. भ. प. श्री. संजय महाराज फत्तेपूरकर यांचे कीर्तन झाले. तसेच हतनूर येथील व वरची आळी नशिराबाद येथील भजनी मंडळांनी भजनी कार्यक्रमात सहकार्य केले. समारोपाच्या कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी नाभिक पंच मंडळासह नशिराबाद ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या