Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबाद शहर भाजपतर्फे भागपूर येथे दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप

नशिराबाद शहर भाजपतर्फे भागपूर येथे दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप

स्व.मा.खासदार वाय. जी. महाजन यांच्या स्मरणार्थ उपक्रमाचे सहाव्या वर्षात पदार्पण

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून भागपूर गावात दिवाळीच्या निमित्ताने फराळ वाटपाचा उपक्रम राबविला जात आहे. स्वर्गीय मा. खासदार वाय. जी. महाजन सर यांच्या स्मरणार्थ सुरू झालेल्या या उपक्रमाने यंदाही सातत्य राखले असून, यावर्षीही भागपूर आणि परिसरातील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांची दिवाळी अधिक आनंदमय व्हावी, यासाठी फराळासह लहान मुलांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. गावातील सुमारे ६० मुलांना टी-शर्ट व खाऊचे पॅकेट देण्यात आले, तसेच भागपूर गावातील प्रत्येक कुटुंबात दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, योगेश पाटील, राजू पाचपांडे सर, जितू महाजन, सुदाम धोबी, अॅड. प्रदीप देशपांडे, सचिन महाजन, किरण पाटील, दीपक सोनवणे, निमगावचे सरपंच अक्षय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अंकुश गायकवाड, मधुकर पवार, नीरज पाटील, मनोज वाघुळदे, राकेश कावडे, ज्ञानेश झोपे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या