नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- काल दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवत नशिराबाद शहरात रूट मार्च काढण्यात आला.पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार सायंकाळी ६.१० ते ६.५० वाजेपर्यंत हा रूट मार्च पार पडला. या रूट मार्चमध्ये नशिराबाद पोलीस स्टेशनचे २ अधिकारी, २५ अंमलदार, ५ पोलीस कर्मचारी, आरसीबी क्रमांक ६ मधील १३ कर्मचारी तसेच तब्बल ४० होमगार्ड सहभागी झाले होते.
रूट मार्चदरम्यान नशिराबाद पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन उंटबिडी चौक, बस स्टँड, शिवाजी चौक, हनुमान पेठ, ग्रामपंचायत चौक, इंदिरा चौक, कुंभार दरवाजा, आठवडे बाजार, विठ्ठल मंदिर, होळी मैदान, उंच आड, स्वातंत्र चौक, साती बाजार, रामपेठ मार्गे परत नशिराबाद पोलीस स्टेशनपर्यंत कडक शिस्त व शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन करण्यात आले. दुर्गा उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी घेतलेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

