Wednesday, February 18, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद : शिवारात विद्युत तार चोरी ; सुमारे ९० हजारांचे नुकसान

नशिराबाद : शिवारात विद्युत तार चोरी ; सुमारे ९० हजारांचे नुकसान

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिवार परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत तार चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकारात सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता महावितरण कार्यालयात राजेश नत्थु पाटील यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली की, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेताजवळील डीपी व पोलवरील विद्युत तार व्यवस्थित होत्या. मात्र दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता शेतात आल्यानंतर डीपी व पोलवरील तार तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या.माहिती मिळताच संबंधित अधिकारी व कर्मचारी सचिन सोनवणे, शैलेश गुरव व स्वप्नील झांबरे घटनास्थळी दाखल झाले पाहणी केली असता कंपनीच्या मालकीच्या एका डीपीसह शेत परिसरातील एकूण २१ इलेक्ट्रिक पोलवरील गाळ्याच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी कापून चोरी केल्याचे निदर्शनास आले.

नशिराबाद पोलिस यांनी याबाबत घटनास्थळी व परिसरात चौकशी केली असता कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी विद्युत तार चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या चोरीमध्ये अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले असून दि. १४ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते दि. १५ फेब्रुवारी सकाळी ८ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संबंधित प्रकरणात भारतीय विद्युत कायदा कलम १३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या