नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद शहरात यंदा भव्य आणि सर्वसमावेशक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी रोजी फ्रूट सेल चौक परिसरात झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिवाजी महाराजांची संपूर्ण आरती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇🏻👇🏻
https://www.facebook.com/share/v/1B2skiuJVn/
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन व आरती करून करण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवचरित्रावर आधारित नृत्य आणि गीत सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यात देवयानी चौधरी हिने हिरकणीच्या ऐतिहासिक घटनेवर भाऊक असे अभिनय पर नृत्य आणि विशेषतः मंदार वाणी या छोट्या कलाकाराने राजे संभाजी यांचा अभिनय करतांना त्यांच्या ग्रुपने अंगावर काटा आणणाऱ्या “राजे संभाजी” या ऐतिहासिक नाट्य सादरीकरणाने वातावरणात भावनिक व प्रेरणादायी रंग भरले. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्ती, इतिहासाभिमान आणि शिवभक्तीचा जोश स्पष्टपणे जाणवत होता.कार्यक्रमाला नशिराबाद नगरपरिषद चे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, नगरसेवक कीर्तीकांत चौबे, लालचंद पाटील, बापू बोढरे, चेतन बऱ्हाटे, विनोद रंधे, किशोर पाटील, गणेश चव्हाण, तसेच मुकुंदा रोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्सव यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ललित मराठे, विश्वनाथ महाजन, भूषण पाटील, हरीश पाटील, चंदन पाटील आणि सागर मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शहरातील सर्व समाजघटकांना एकत्र आणणारा हा उत्सव सामाजिक एकोपा, इतिहासाभिमान आणि संस्कृती जपण्याचा संदेश देणारा ठरला. नशिराबादकरांसाठी हा उत्सव अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

