Monday, March 2, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबाद नगर परिषदेकडून स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी हायड्रोलिक क्रेनचा वापर

नशिराबाद नगर परिषदेकडून स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी हायड्रोलिक क्रेनचा वापर

उंच ठिकाणांवरील कामे अधिक सुरक्षित व जलद होणार ; लवकरच स्वतःची क्रेन उपलब्ध होमार.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्तीची कामे जलदगतीने व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नशिराबाद नगर परिषद यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उंच ठिकाणांवरील दिव्यांची दुरुस्ती करताना वेळेची बचत व्हावी व नागरिकांना तत्काळ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रथमच हायड्रोलिक क्रेनचा वापर सुरू करण्यात आला आहे.सध्या नगर परिषदेकडे स्वतःची हायड्रोलिक क्रेन उपलब्ध नसल्यामुळे भाडेतत्त्वावर क्रेन मागवून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या माध्यमातून शहरातील बंद पडलेले व अकार्यक्षम स्ट्रीट लाईट तातडीने कार्यान्वित करण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

याबाबत नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले की, नगर परिषदेसाठी स्वतंत्र हायड्रोलिक क्रेन खरेदी करण्याची मागणी करण्यात आलेली असून लवकरच नवीन क्रेन नगर परिषदेत दाखल होणार आहे. त्यामुळे भविष्यात दुरुस्तीची कामे अधिक कार्यक्षमतेने व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडता येणार आहेत.या उपक्रमात नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ), उप नगराध्यक्ष पंकज महाजन, सभापती चेतन बऱ्हाटे तसेच सर्व सभापती व नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासन कार्यरत आहे. शहरातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होत आहे.

नशिराबाद नगर परिषदेच्या नूतन कार्यपद्धतीची ही एक सकारात्मक झलक मानली जात असून, नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या