जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-तालुक्यातील नशिराबाद येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिवरायांचे आरमार, अस्सल चित्रांचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ, शिवसह्याद्री प्रतिष्ठान व मित्रपरिवार नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला. दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत श्री मंगलमूर्ती मंगल कार्यालय येथे धरणगाव येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
त्यांनी शिवरायांच्या जीवनकार्याचा वेध घेत शेतकऱ्यांचे कैवारी, पर्यावरण रक्षक, प्रभावी जलव्यवस्थापन करणारे, आई-वडिलांची आज्ञा पाळणारे, रयतेची काळजी घेणारे तसेच आरमाराचे जनक म्हणून शिवरायांचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पलीकडचे असल्याचे प्रतिपादन केले.दि. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान शिवरायांचे भव्य आरमार व जहाज व्यवस्थेचे प्रदर्शन महेश पवार (जळगाव) यांच्या पुढाकारातून साकारण्यात आले. तसेच शिवरायांचा पोशाख आणि जगभरातील अस्सल छायाचित्रांच्या प्रदर्शनासाठी संकेत गांगुर्डे (धरणगाव) यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रमोद आमोदकर यांनी मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या शिवजयंती उत्सवाची माहिती दिली. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभूराजे यांच्या जन्मोत्सव व कार्यावर आधारित नाटिका आणि विलोभनीय नृत्य सादर केले. या विद्यार्थ्यांना प्रवीण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. चिमुरडी कुमारी तनिष्का चव्हाण हिनेही प्रभावी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. गोदावरी वैद्यकीय कॉलेजचे डॉ. आदित्य पाटील यांनी शिवरायांच्या जीवनावर सादर केलेल्या कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. खंडारे यांनी बहारदार शैलीत केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन तसेच धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई सुरेश चौधरी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नशिराबादचे नगरसेवक लालचंद पाटील, कीर्तीकांत चौबे, विकास पाटील, मनोज पाटील, विकास धनगर, पराग नारखेडे, बापू बोढरे, चेतन बऱ्हाटे, सचिन हिंगणे, प्रदीप देशपांडे, किशोर पाटील, भूपेश कुलकर्णी, जनार्दन माळी, आनंदराव मराठे, भानुदास मराठे, अवधूत मराठे, मुकुंदा रोटे, प्रकाश माळी, बाळू सोनवणे (नांद्रा ग्रुप) आदी मान्यवर उपस्थित होते.यांच्यासमवेत पत्रकार विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, हरीष पाटील, सुनिल महाजन, डॉ.दिपक लोखंडे, सागर मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गणेशभाऊ चव्हाण आणि सोनालीताई चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, उपाध्यक्ष देविदास काकडे तसेच सदस्य किशन साळुंखे, महेंद्र मराठे, अनिल काळे, संजय पाटील, अरुण मराठे, अशोक मराठे, शांताराम मराठे, सुभाष मराठे, सुरेश मराठे, बापू शिंदे, नथ्यू चव्हाण, राहुल मराठे, भरत मराठे, दिपक चव्हाण, जयेश पाटील, लोमेश पाटील, गणेश मराठे, भूषण मराठे, रमेश मराठे, गोकुळ मराठे, ललित मराठे, कुदंन मराठे, पवन मराठे, किशोर चव्हाण, प्रवीण मिस्तरी, युवराज मराठे, शुभम जाधव, किरण नांद्रे, रोहन माळी, अभिषेक माळी आदींनी परिश्रम घेतले.


