नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद टोल नाक्याच्या IMT टीमतर्फे गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथम गणरायाची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर सजविलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान DJ च्या गजरात गाण्यांच्या ठेक्यावर कर्मचाऱ्यांनी जल्लोषात ठेका धरत गणरायाला निरोप दिला. वातावरण “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी दुमदुमून गेले.
या कार्यक्रमासाठी सत्येंद्र सिंग (मॅनेजर, इन्का), संदीप चौधरी, आत्माराम पाटील, जयेश कोळी, किरण पाटील, प्रवीण ठाकूर, शांताराम भगत, विनोद सपकाळे, सुनील गुंजाळ, नितीन पाटील, अंकित दुबे, धीरज पाटील, कैलास सपकाळे, सागर शिंदे, सुनील सर, भीमसिंग, सुरज, शुभम लाहोरिया, सचिन मराठे, विल्सन मिसाळ, श्रीकांत बोढरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्धरीत्या करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत सामूहिक एकजूट दर्शविली. नशिराबाद टोल नाक्यावरील हा विसर्जन सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.