नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दि. 23 ऑगस्ट बुधवार रोजी नशिराबाद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर 3 च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. झाला. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. वृक्षारोपण न्यू इंग्लिश स्कूलचे कार्याध्यक्ष योगेश नारायण पाटील (पिंटू शेठ) यांच्या हस्ते करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला माजी ग्रा.सरपंच पंकजभाऊ महाजन, गणेशभाऊ चव्हाण ,बरकत अली युसुफ अली, दीपक सोनवणे, सांडू पैलवान ,अमजद खान, आनंदा रंधे, शे.अजू. ई उपस्थित होते. तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नशिराबाद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर 3 च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
RELATED ARTICLES