Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबाद उर्दू शाळेतील भरती थांबली...संस्थेतील शिक्षक भरतीला स्थगिती ; शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश...

नशिराबाद उर्दू शाळेतील भरती थांबली…संस्थेतील शिक्षक भरतीला स्थगिती ; शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश जारी..

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अंजुमन फरोग-ए-तालीम नशिराबाद, संचलित, के. एस. टी. उर्दू हायस्कूल नशिराबाद, ता. जि. जळगाव या शाळेत सतत चेअरमन आणि सभासद पदांसाठी दोन गटाकडून दावा केला जात आहे. या संस्थेच्या ताब्याविषयी गेल्या काही वर्षापासून दावे प्रतिदावे केले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना दाखले वाटप करतांना गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी व पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले देण्यात आले होते.

नशिराबाद येथील अंजुमन फरोग-ए-तालिम संस्थेच्या के.एस.टी. उर्दू हायस्कूल, नशिराबाद येथे विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार शिक्षक सेवक, लिपिक सेवक, प्रयोगशाळा सहाय्यक आदी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. दि. २८ सप्टेंबर रोजी मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना संस्थेकडून बोलावण्यात आले होते.परंतु, या भरतीबाबत संस्थाचालकांच्या दुसऱ्या गटाकडून हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. यासंदर्भात जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. संबंधित तक्रारीची दखल घेत शिक्षण अधिकारी यांनी सदर भरती प्रक्रियेवर स्थगिती (जा.क. शिक्षण / माध्य/एस-२/ १७१२९३६ दि. २६/०९/२०२५) आणली आहे. याबाबत दि. २७ सप्टेंबर रोजी संस्थाचालकांच्या दुसऱ्या गटा कडून स्थगिती आदेश स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या संदर्भात दि. २३ सप्टेंबर रोजी स्थानिक वृत्तपत्रात मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून, संस्थेच्या विद्यमान परिस्थितीवर लक्ष वेधण्यात आले होते. त्यामध्ये नमूद करण्यात आले होते की, संस्थेतील शिक्षक/शिक्षकेतर पदांची भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी व पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही भरती प्रक्रिया राबवू नये. त्यामुळे आधी प्रसिद्ध झालेल्या भरती जाहिरातीप्रमाणे मुलाखती होणार नाहीत, असे स्पष्ट झाले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून पुढील निर्णय येईपर्यंत ही भरती थांबविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या