Sunday, February 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद शेतात गळफास ; वृद्धाचा मृत्यू

नशिराबाद शेतात गळफास ; वृद्धाचा मृत्यू

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे  एक वृद्ध झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत मिळून आले. चेतन सोपान रोटे (वय ४०, व्यवसाय शेती, रा. खालची आळी) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शरद सुका रोटे (वय ६७, रा. नशिराबाद ता. जि. जळगाव) यांचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक २१ फेब्रुवारी  रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्यापूर्वी नशिराबाद शिवारातील गट क्रमांक ११८ मधील शेतात बोरीच्या झाडाजवळ घडली.माहिती देणारे चेतन रोटे यांना सकाळी नवल पाटील यांचा फोन आला. त्यांनी त्यांच्या शेतातील बोरीच्या झाडाजवळ शरद रोटे यांनी गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी पाहणी केली असता शरद रोटे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून अहवाल मा. तालुका दंडाधिकारी, जळगाव यांना पाठविण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा प्राथमिक तपास पो .हे.का प्रशांत विरणारे करत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या