Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यनशिराबाद येथे ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाचा शुभारंभ; 100 दिवसीय मोहिमेला सुरुवात

नशिराबाद येथे ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाचा शुभारंभ; 100 दिवसीय मोहिमेला सुरुवात

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. 24 मार्च 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद येथे ‘टीबी मुक्त भारत अभियान’ या 100 दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी (DTO) डॉ. विशाल पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सर्व क्षयरोग रुग्णांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. ‘टीबी मुक्त भारत’ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घ्यावयाची काळजी, तसेच क्षयरोग प्रतिबंध आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत डॉ. सचिन भायेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 दीर्घकालीन खोकल्याच्या रुग्णांची छातीची एक्स-रे तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्षयरोगाच्या लवकर निदान, नियमित औषधोपचार आणि पोषणाच्या महत्त्वावर विशेष भर दिला.टीबी निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या तसेच संपूर्ण पीएचसी स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या