Thursday, February 19, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादमध्ये आज शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नशिराबादमध्ये आज शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद येथे दि.१९ फेब्रुवारी आज रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वसमावेशक स्वरूपाच्या या उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रामपेठ फ्रूट्स सोसायटी चौक येथे सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.

या कार्यक्रमात शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित नाटिका, भव्य नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतगायन सादर करण्यात येणार आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या