घोषणाबाजी; टोलमुक्त करत 3 व 4 चाकी वाहने सोडली
नशिराबाद /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील संपूर्ण टोलनाक्यांवर दोन चाकी, तीन चाकी, आणि चार चाकी,खाजगी वाहनांचा महाराष्ट्र शासन जर टोल भरत असेल तर खाजगी वाहनधारकांकडून का वसूल केले जातो? याचा जाब विचारण्यासाठी आणि टोल मुक्त वाहन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांच्या नेतृत्वात आज नशिराबाद टोल नाका या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. वाहन टोल मुक्त करण्यात आले तसेच वाहनधारकांना चार चाकी खाजगी वाहनधारकांनी टोल भरू नये असे आवाहन मनसेकडून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता.
आंदोलना वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे दुसरे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे जनहितचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, उपजिल्हाध्यक्ष जळगाव ग्रामीण मनोज घुगे, भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, जळगाव महानगर लअध्यक्ष विनोद शिंदे, जळगाव महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, निधी कक्षाचे राजेंद्र निकम, विकास पाथरे, कुणाल पाटील, साजन पाटील, जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष हेमंत कोळी, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, उपशहर अध्यक्ष अमोल माळी, गोपाल भारुडे, दीपक जावळे, रामेश्वर धोबी, ज्ञानेश्वर मराठी, विकास राऊत, महेश माळी, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, हरी ओम सूर्यवंशी, प्रशांत बाविस्कर, प्रमोद घुले, राजू डोंगरे, एडवोकेट सागर शिंपी, मयूर सुरवाडे, सुजित शिंदे, किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना यावल पवन तायडे, नितीन डांबरे, श्याम पवार, आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.