नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम :- दिनांक २५ फेब्रुवारी वार रविवार रोजी नशिराबाद येथे प्रथमच ” शिव जन्मापासून ते शिवराज्याभिषेक महानाट्य ” चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हे अखिल भारतीय सकल मराठा समाज आणि मराठा पंच मंडळ नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जळगाव तसेच स्थानिक असे एकूण १४८ कलाकारांचा सहभाग..
या आयोजन केलेल्या महानाट्यात प्रथम शिव जन्मोत्सव, त्यानंतर महाराजांचे बालपण ,तरुण पण, तसेच महाराजांनी केलेले कार्य व कामगिरी त्यानंतर शिवराज्याभिषेक गीत , संगीत, पोवाडा, नाट्य, नृत्य असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जवळपास जळगाव तसेच स्थानिक असे एकूण १४८ कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
या कार्यक्रमाचे दिनांक २५ फेब्रुवारी वार रविवारी संध्या. ६ वाजता आठवडे बाजार ,खालची आळी ,नशिराबाद येथे आयोजन.
दरम्यान कार्यक्रमांमध्ये शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना व तरुणांना सहभागी होता यावे यासाठी मुद्दामहून कार्यक्रम हा सुट्टीचा दिवस निवडून दिनांक २५ फेब्रुवारी वार रविवारी संध्या. ६ वाजता आठवडे बाजार ,खालची आळी ,नशिराबाद येथे ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष भव्य दिव्य व सुंदर अशा कार्यक्रमास सहभागी व्हावे व ” शिव जन्मापासून तर शिवराज्याभिषेक महानाट्य ” या कार्यक्रमाचा संपूर्ण आनंद घ्यावा असे आवाहन अ.भा सकल मराठा समाज यांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती..
या महानाट्य कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन शुभदा नेवे यांची असून कार्यक्रमाचे सादरकर्ते शिव सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण व अखिल भारतीय सकल मराठा समाज नशिराबाद चे हेमंत मराठे, मराठा पंच मंडळ अध्यक्ष महेंद्र मराठे, व उपाध्यक्ष तसेच विशेष मार्गदर्शन डॉ. प्रमोद आमोदकर, बापू दादा शिंदे, सौ सोनाली गणेश चव्हाण, तसेच प्रेरणा -शिवरत्न तसे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आदरणीय दादा नेवे आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक परिवहन समिती सुरत महानगरपालिका सभापती तथा,अखिल भारतीय मराठा समाज अध्यक्ष सोमनाथ भाऊ मराठे हे असणार आहेत. तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक राजकीय यासह विविध क्षेत्रातील तसेच विशेष प्रशासकीय अधिकारी अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.