Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद येथील श्री.संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताह सोहळा उत्साहात साजरा...

नशिराबाद येथील श्री.संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताह सोहळा उत्साहात साजरा…

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नशिराबाद येथे श्री.संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात हभप.श्री.सुनील महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सप्ताहाच्या सुरुवातीला सर्वप्रथम या सप्ताहाला किरण शांताराम माळी यांच्या हस्ते प्रारंभी श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पोथीचे सपत्नीक पूजन करून विष्णू सहस्त्रनाम व पारायण ला सुरुवात करण्यात आली.सप्ताह सोहळ्यात दैनादिन असे काकडा आरती, पारायण, हरिपाठ व किर्तन असे कार्यक्रम साजरे करण्यात आले.

दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वा. दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात करण्यात आली. यात दिंडीचे प्रमुख आकर्षण विठ्ठल वेशभूषेत असलेला रिद्देश अनिल माळी हा ठरला यात सर्व पुरुष व महिला भाविकांनी विठ्ठल नामाच्या गजरात पाऊली खेळत दिंडीचा आनंद घेतला. त्यानंतर केकत निभोंराचे राजेंद्र महाराज यांनी केलेल्या काल्याचे किर्तनाने सर्व भाविकांची मने जिंकली. व सोहळा संपंन झाला.

या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच विकास पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील(पिंटू शेठ) शिवसेना शहराध्यक्ष विकास धनगर, शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण, नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच पंकज महाजन, डी डी माळी, नेमीचंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत सावता महाराज यांच्या मंडळाचे वरची आळी उपाध्यक्ष संदीप पाटील, सेक्रेटरी पंढरीनाथ पाटील, सचिव प्रवीण महाजन, सभासद अशोक माळी, जगन्नाथ पाटील, मधुकर माळी, सतोष पवार, सुनिल दगडु महाजन, गणेश पाटील, हेमराज महाजन, सदिप जगताप, तसेच संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ, आणि गावातील सर्व भजनी मंडळ यांच्या उपस्थितीने अनमोल परिश्रम घेतले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या