जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने आज दि. २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पार पडला.
रूट मार्चदरम्यान नशिराबाद पो.स्टे. हद्दीतील उंटबिडी चौक, बस स्टॅन्ड, शिवाजी चौक, हनुमान पेठ, ग्रामपंचायत चौक, इंदिरा चौक, कुंभार दरवाजा, आठवडे बाजार, विठ्ठल मंदिर, होळी मैदान, उंच आड, स्वातंत्र चौक, साती बाजार, रामपेठ मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यात परत आले. या रूट मार्चमध्ये नशिराबाद पोलीस ठाण्याचे २ अधिकारी, २५ अंमलदार, ५ जीआरपी जवान तसेच ३२ होमगार्ड यांचा समावेश होता. सायं. ५.०५ वा. ते ५.४० वा. दरम्यान हा रूट मार्च यशस्वीरीत्या संपन्न झाला.
रूट मार्चामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश देण्यात आला.