मुंबई | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील सात दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.राज्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार आहेत. कारण आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील सात दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 18-19 ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि 19-21 ऑगस्ट रोजी गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामध्येही अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, 18-19 ऑगस्टला किनारी आंध्र प्रदेशात आणि 18 ऑगस्ट रोजी ओडिशा आणि तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.