जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:– या आमच्या पोर्टलला काल दि.4 फेब्रुवारी रोजी “हाई झुमका वाली पोरं… या प्रसिद्ध अल्बममधील कलावंत सचिन कुमावतविरुद्ध नाशकात अत्याचाराचा गुन्हा दाखल…! या शीर्षकाखाली ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
हाई झुमका वाली पोर…या अल्बम मध्ये असलेला अभिनेता विनोद उर्फ सचिन कुमावत यांच्या फोटोच्या ठिकाणी चुकून सचिन कुमावत ( शेंदूर्णी ) या कलावंताचा फोटो टाकला गेलाय..ही टेक्निकल चूक आमच्याकडून झाली आहे..कुणाला दुखवण्याचा व बदनाम करण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता ,उलट कलाकाराला न्याय देण्याचा ,सांस्कृतिक, साहित्य विषयक उपक्रमाना न्याय देण्याचा आमचा प्रांजळपणे हेतू असतो,सकारात्मकता असते..दोन्ही कलावंतांच्या नावात साम्य असल्याने आमच्याकडून ही चूक झाली आहे,हे आम्ही मान्य करतो..त्या बद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करीत आहे.
मुळात “हाई झुमका वाली पोर” हे गाण सचिन कुमावत(शेंदुर्णी) यांच नाही..त्याबद्दल पण कुणी गैरसमज करू नये.सचिन कुमावत(शेंदुर्णी) यांची आम्ही दिलगिरी व्यक्त केली, त्यांना कलेच्या पुढील प्रवासासाठी पोलीस दक्षता लाईव्हतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा…