जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगावच्या महावितरण विभागात गैरप्रकार तर होतच आहेत, शिवाय लाचखोरी वाढत चालली आहे,या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून अनेक वेळा लाच घेताना पकडल्याचे चित्र आहे.यामुळे या खात्यातील गैरप्रकार,भ्रष्टाचार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे.वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला रंगहात पकडले आहे.या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. संतोष भागवत प्रजापती (वय-३२) रा. आदर्शननगर, कक्ष, जळगाव असे अटक केलेल्या वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मीटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पथकाना सापळा रचून वरीष्ठ तंत्रज्ञ प्रजापती याला २५ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव पोलीस निरीक्षक अमोल वलसाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र घुगे,पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस नाईक सुनिल वानखेडे,पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ,पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सुर्यवंशी यांनी कारवाई केली.या खात्यात गैरप्रकार वाढतच चालले असून हे खाते व जळगाव बदनाम होत चालले आहे.