Saturday, September 14, 2024
police dakshta logo
Homeअपघातब्रेकिंग : नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 17 प्रवाशांना जलसमाधी,भुसावळ भाविकांचा समावेश...! दुःखाचे...

ब्रेकिंग : नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 17 प्रवाशांना जलसमाधी,भुसावळ भाविकांचा समावेश…! दुःखाचे सावट पसरले…

मुख्य संपादक चंदन पाटील…

जळगाव / कार्यकारी संपादक/ तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील तळवेल, पिंपळगाव, आचेगाव आणि परिसरातील भाविकांना देव दर्शन आणि पर्यटनासाठी घेऊन जाणारी खाजगी बस नेपाळ येथील पोखरानजीकच्या नदीत कोसळली.. या घटनेत जवळपास 18 भाविकांचा मृत्यू ओढवला आहे. सकाळी नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातातील बहुतांश प्रवाशी हे वरणगाव व तळवेल ,आचेगाव येथील असल्याची माहिती समोर आल्यामुळे परिसराला मोठा धक्का बसला आहे. याबाबतच्या मदत कार्यावर केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे व आमदार एकनाथराव खडसे हे लक्ष ठेवून आहेत. तर आमदार संजय सावकारे हे तातडीने नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

बसमध्ये ४१ प्रवाशांसह चालक व क्लिनर असे एकूण ४३ जण बसमध्ये करीत होते प्रवास…
नेपाळमध्ये आज शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही बस (युपी ५३ एफटी ७६२३) या क्रमांकाची होती. ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात होती. भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. या बसमध्ये ४१ प्रवाशांसह चालक व क्लिनर असे एकूण ४३ जण बसमध्ये प्रवास करत होते. यातील १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर अन्य १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बहुतांश प्रवाशी है वरणगाव व तळवेल येथील, आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील रक्षाताईंसोबत अपघातातील जखमींची व्हिडीओ कॉलवरून केली विचारपूस..!

या बसमधील बहुतांश प्रवाशी है वरणगाव व तळवेल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे यातील काहीजण हे प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच या संदर्भात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी तातडीने माहिती घेवून मदत कार्यात मदत केली. तर आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील रक्षाताईंसोबत अपघातातील जखमींची व्हिडीओ कॉलवरून विचारपूस केली.आणि सातत्याने करत आहेत.

आमदार संजय सावकारे यांचा अपघातात जखमी झालेल्यांशी व्हिडीओ कॉल करून संवाद..

तसेच आमदार संजय सावकारे यांनी देखील तातडीने अपघातात जखमी झालेल्यांशी व्हिडीओ कॉल करून संवाद साधून त्यांना धीर दिला. सुत्रांच्या माहितीनुसार आमदार संजय सावकारे हे तातडीने विमानाने नेपाळ येथे जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे,आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी आताच संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

नगरसेवक सुधाकर जावळे यांच्या सोबत 31 जण नेपाळ येथे गेले होते.

वरणगांव येथील रहिवासी नगरसेवक सुधाकर जावळे यांच्या सोबत 31 जन नेपाळ येथे श्री परशुराम देवस्थानला जात असताना बस नेपाळ येथे नदीत कोसळल्याने आत्ता पर्यंत 17 शव बाहेर काढण्यात यश आले आहे. युध्दपातळीवर यंत्रणा मदत कार्य करीत आहे.दरम्यान या दुर्दैवी घटनेची चर्चा वाऱ्यासारखी भुसावळ तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात पसरली असून शोक व्यक्त होत आहेत.

ब्रेकिंग :- दरम्यान ,आताच मिळालेल्या माहितीनुसार , भुसावळचे आमदार संजय सावकारे , भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे ,परीक्षित बऱ्हाटे हे तातडीने इंदौर निघाले आहेत ,तेथून सायंकाळी उत्तरप्रदेशात जातील आणि मग पुढे काठमांडू येथे हॉस्पिटलमध्ये पोहचतील ..

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे घटनेची माहिती घेत असून दूतावास यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या