Saturday, September 14, 2024
police dakshta logo
Homeअपघातनेपाळ बस अपघातातील 24 जणांचे मृतदेह आज हवाई दलाच्या विमानाने महाराष्ट्रात आणण्यात...

नेपाळ बस अपघातातील 24 जणांचे मृतदेह आज हवाई दलाच्या विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- नेपाळमधील तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२२) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडलेल्या भीषण बस अपघातातील 24 जणांचे मृतदेह उद्या (शनिवारी) महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. हे 24 मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने आणले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाचा कार्यभार असल्याने त्यांनी घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीतील इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या प्रकरणात मृतदेह परत आणण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तनहुन जिल्ह्यात एना पहारा महामार्गावर नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्चिमेकडे अबुखैरेनी गावाजवळ बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती बस महामार्गावरून थेट डोंगररांगांमध्ये असलेल्या नदीमध्ये जाऊन कोसळली. या बसमध्ये चालक आणि सहाय्यक चालकासह ४३ प्रवासी होते. मृत्युमुखी पडलेले सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळमधील तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२२) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना काही भाविकांना वाचविण्यात यश आले आहे. अन्य बेपत्ता भाविकांचा कसून शोध घेतला जात आहे

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.

समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली. समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त

वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार

मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर नेपाळ येथून वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.
००००

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या