नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील न्यू इंग्लिश स्कूल (केंद्र क्रमांक 30-35) येथे सन 2026 च्या दहावीच्या परीक्षेसाठी बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्रावर एकूण 16 ब्लॉकमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये ब्लॉक क्रमांक 1 ते 10 हे पहिल्या मजल्यावर तर ब्लॉक क्रमांक 11 ते 16 हे तळमजल्यावर मुख्य शाळा इमारतीत असणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत होणाऱ्या या परीक्षेत मराठी विषयासाठी ब्लॉक क्रमांक 1 ते 10 मध्ये मराठी माध्यमातील परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ब्लॉक क्रमांक 11 ते 16 मध्ये उर्दू माध्यमातील उर्दू विषयाच्या परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.केंद्र क्रमांक 30-35 येथे परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वेळापत्रकानुसार सकाळी 9.45 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान एसएससी बोर्डाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पडणार असल्याची माहिती केंद्र संचालिका श्रीमती एस. ए. बनसोडे यांनी दिली आहे.

