नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपकार्याध्यक्षा प्रमिला महाजन होत्या.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रम साफल्य अपंग महिला स्वयंसहायता गटाच्या संचालिका त्रिवेणी ताई माळी, नशिराबाद नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा नगरसेविका मण्यार कमरुनिसा सय्यद बिस्मिल्ला, नगरसेविका जनाबाई भगवान रंधे, हिनाबी मोहम्मद रईस कासार, भारताबाई विकास धनगर, सुवर्णाताई सचिन महाजन, शाह हनीफाबी मोहम्मद खलील यांच्यासह वैशाली पाटील, अर्चना माळी, विजया चौधरी, आशा माळी, रुपाली पाटील, सीमा पाटील, प्रेरणा देशपांडे, अंकिता वाणी, संगीता महाजन, रंजना माळी तसेच माध्यमिक विभागातील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर सुनीता शिवरामे यांनी महिला दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.प्रमुख अतिथी त्रिवेणी माळी यांनी आपल्या मनोगतातून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेत आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केले. तर आशा माळी यांनी मुलांवर चांगले संस्कार घडवून उत्तम नागरिक तयार करण्यासाठी आई म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून पालकांना मार्गदर्शन केले.नगरसेविका जनाबाई रंधे यांनी महिलांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आपल्या कार्याचा ठसा समाजात उमटवावा, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमादरम्यान उपस्थित माता-पालकांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियोजन शितल चावरे, वंदना चौधरी, नयना भंगाळे, मंगला पिंगळे व स्वाती चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

