नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रविण महाजन तर मंचावर उपशिक्षिका वंदना चौधरी व मंगला पिंगळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रतिमापूजनाने झाला. यानंतर लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनकार्यावर भाष्य केले. उपशिक्षिका वंदना चौधरी यांनी टिळकांविषयी, तर वैशाली पाचपांडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत प्रेरणादायी माहिती दिली.वकृत्व स्पर्धेत बालवाडी विभागातून प्रथम क्रमांक निशा सदाफळे, द्वितीय राजेश्री माळी, तृतीय जान्हवी महाजन यांनी मिळवला. प्राथमिक विभागात लहान गटातून प्रथम प्रेरणा वाणी, द्वितीय तन्वी बाऱ्हे तर मोठ्या गटात प्रथम नूतन गोसावी व द्वितीय देवेंद्र भाई यांनी यश मिळवले.
या प्रसंगी मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या माध्यमिक विभागातील रोहित माळी, श्रद्धा व प्रसाद सराफ यांचा मुख्याध्यापक सुनिता बनसोडे व उपशिक्षक जितेंद्र महाजन यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन पूजा पाटील, दिव्या सावळे, स्वाती चौधरी व वर्षा कोल्हे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.