Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावशिक्षणप्रेमी एन. टी. पाटील (बापू ) निवर्तले ,आज अंत्यसंस्कार

शिक्षणप्रेमी एन. टी. पाटील (बापू ) निवर्तले ,आज अंत्यसंस्कार

जळगाव / प्रतिनिधी :- तालुक्यातील कडगाव येथील जयहिंद विद्यालयाचे संस्थापक व भगीरथ शाळेचे माजी मुख्याध्यापक शिक्षण महर्षी एन. टी.( बापू ) पाटील (वय 95) यांचे वृद्धापकाळाने आज दि.६ ऑगस्ट बुधवारी रात्री 10 वाजता दुःखद निधन झाले. ते प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.राजेंद्र पाटील व उद्योजक उल्हास पाटील यांचे वडील होते. श्री.एन. टी. पाटील हे मितभाषी होते तसेच त्यांना अध्यात्म व सामाजिक कार्याची आवड होती. त्यांच्यावर दि.7 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 10 वाजता वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा रिंगरोड ,बहिणाबाई उद्यानासमोरील ” अजिंक्य ” या निवासस्थानातून निघेल. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या