Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeशैशणीकनूतन प्राथमिक विद्या मंदिर चिनावल येथे चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ संपन्न.

नूतन प्राथमिक विद्या मंदिर चिनावल येथे चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ संपन्न.

मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे…
अंतरावर पसरलेले टिपूर से सुखाचे चांदणे..!

चिनावल/पोलीस दक्षता लाईव्ह :- आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ आपण जिथे घालवला, सोबतीने खेळलो, शिकलो, अभ्यास केला, मस्ती केली त्या शाळेला, शिक्षकांना, मित्र मैत्रिणींना गुडबाय बोलणे खूप कठीण असते आणि असाच कडू आणि गोड क्षण नूतन परिवाराला पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना सुंदर असे शूभेच्छा पत्र आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना निरोप देण्यात आला. जुन्या आठवणींना उजाळा देत भवितव्याबाबत मार्गदर्शन करुन भावूक वातावरणात निरोप समारंभ संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनमोल सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या