Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमवा रे वा...! ऑनलाईन फसवणूक.....तीही तब्बल 58 कोटीची....?

वा रे वा…! ऑनलाईन फसवणूक…..तीही तब्बल 58 कोटीची….?

नागपूर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- आपण सतत ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडल्याची बातमी ऐकत असतो त्यात आपण फार तर काही हजार, लाख, किंवा एखाद कोटी पर्यात ऐकलेले असेल, नागपूर इथे मात्र एकूण 58 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तो ही चक्क ऑनलाईन गेमच्या माध्यमातून…!

सविस्तर वृत्त असे की,ऑनलाइन खेळाच्या माध्यमातून नफा कमवून देण्याच्या उद्देशाने नागपूर शहरातील एका व्यापाऱ्याची ही फसवणूक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत याप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत एकूण 17 कोटी रुपयांची रक्कम, साडेबारा किलो सोने तर 300 किलो चांदी आरोपीकडून जप्त केलेली आहे. या जप्त करण्यात आलेल्या ऐवजांपैकी काँग्रेसच्या एका राजकीय नेत्याची यात काही रक्कम देखील असल्याचा दावा करीत आरोपीच्या वकिलांनी या नेत्यावर आरोप लावले आहे. गोंदियातील काका चौक येथे काही दिवसांपूर्वी अनंत उर्फ सोंटू जैन यांच्या घरी नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालत कारवाई केलेली होती. अनंत जैन यांनी फिर्यादी व्यक्ती यांची ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा हा प्रकार होता. नागपूर पोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आणि तब्बल 14 कोटी रुपयांची रक्कम आणि साडेबारा किलो सोन्याचे बिस्किट असा ऐवज हस्तगत केलेला आहे.तर पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या