जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : – मा. पोलीस अधीक्षक सो., जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात हरविलेल्या तसेच पळविण्यात आलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत दाखल गुन्हा नोंद असलेल्या अपहृत 15 वर्षीय बालिकेचा अवघ्या 24 तासांच्या आत शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदर बालिका ही रागाच्या भरात आई-वडिलांना न सांगता घरातून निघून गेली होती. घटनेची तात्काळ दखल घेत कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. बालिकेच्या गावापासून विविध पोलीस स्टेशन हद्दीतील रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना तत्काळ सूचना देण्यात आल्या.बालिकेच्या शरीरयष्टीच्या वर्णनानुसार चाळीसगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदारांना पायी दिंडीमध्ये सदर बालिकेसारखी दिसणारी मुलगी आढळून आली. यानंतर चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सहकार्याने शोध पथक रवाना करण्यात आले. स.पो.नि. श्रीकांत पाटील, पो.उ.नि.धर्मराज पाटील, पोहेका नंदलाल परदेशी, पो.हे.का. नितीन सूर्यवंशी, पो.ना. किरण गाडीलोहार, पो.ना. प्रदीप पाटील, पो.का. योगेश गो. पाटील, पो.का. स्वप्निल परदेशी यांनी खात्री करून सदर बालिकेचा शोध घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले.नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर बालिकेस तिच्या मूळ पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही संपूर्ण शोध मोहीम मा.पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, मा.अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव विभाग विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली

