Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedपी.जी. कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संचलित माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल कढोली ता.एरंडोल शाळेचा...

पी.जी. कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संचलित माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल कढोली ता.एरंडोल शाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न.

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :– दि.15 जून वार शनिवार रोजी कढोली येथे पी.जी.कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संचलित माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल चे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रारंभी कढोली येथील सरपंच किरण नन्नवरे यांचे स्वागत पी.जी.कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संस्थेचे सचिव प्रताप कुमावत यांनी केले. तसेच उपसरपंच ज्योती कोळी यांचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्षा संगीता शाम कुमावत यांनी केले. तर मोहन सोनवणे पंचायत सभापती यांचे स्वागत संस्थेचे संचालक देविदास पाटील (दादा पाटील )यांनी केले. ग्रामपंचायत चे सदस्य निलेश भोई यांचे स्वागत माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्रिन्सिपल राखी बडगुजर यांनी केले.

त्यानंतर पी.जी. कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संचलित माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल कढोली ता.एरंडोल शाळेचा सरपंच किरण नन्नवरे, तसेच उपसरपंच ज्योती कोळी व सर्व सदस्य यांच्याकडून उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला डीपोजी किशोर भास्कर नन्नवरे, सदस्य निलेश प्रकाश भोई, राजू लक्ष्मण नन्नवरे, गोकुळ बाळू पाटील, शिवाजी त्रंबक पाटील, डॉ. सुधीर पाटील, नाना कडू बडगुजर, दिपक बडगुजर, सभापती मोहन लहू सोनवणे, विनोद भिमसिंग पाटील, डॉ.शरद पाटील, सरपंच नारायण सोनवणे, दगडु चिंगा, पोलीस पाटील रामदास भागवत सोनवणे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या