Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापाच हजारांची लाच घेतांना मंडळाधिकाऱ्याला रंगेहात अटक..

पाच हजारांची लाच घेतांना मंडळाधिकाऱ्याला रंगेहात अटक..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- पिंप्राळा येथील मंडळाधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच घेतांना मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर वय-४७, रा. पिंप्राळा याला रंगेहात पकडले असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागात या कारवाईची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील सावखेडा गावातील तक्रारदार राहीवाशी यांनी १६ मे रोजी तक्रारदार यांच्या वडिलांचे व आते भावाचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून त्यावर त्यांच्या आईचे नाव लावण्या संदर्भात तलाठी कार्यालय पिंप्राळा येथे अर्ज सादर केला होता. चार दिवसानंतर दि.२० मे रोजी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तलाठी कार्यालयात येऊन चौकशी केली असता मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर दि.२७ मे रोजी तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभाग कार्यालयात येवून या प्रकरणी तक्रार दिली.

तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंध पथकाने गुरूवार दि.६ जून रोजी सापळा रचला. त्यात ५ हजारांची लाच घेत असतांना मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईची जळगाव शहरातील महसूल विभागात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या