Sunday, March 29, 2026
police dakshta logo
Homeक्राईमपाचोरा बस स्टॅण्डवरील चोरीप्रकरणी अट्टल चोरटे ताब्यात; हद्दपार आरोपीसह विधीसंघर्ष बालकाचा समावेश

पाचोरा बस स्टॅण्डवरील चोरीप्रकरणी अट्टल चोरटे ताब्यात; हद्दपार आरोपीसह विधीसंघर्ष बालकाचा समावेश

पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा गुन्हे शाखेने कारवाई करत दोन अट्टल चोरट्यांना जेरबंद केले आहे. यामध्ये जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी तसेच एक विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे.याबाबत माहिती अशी की, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी फिर्यादी सुभाष विठ्ठल भावसार (वय ७०, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरी विक्री करून मिळालेली ५० हजार रुपयांची रक्कम घेऊन बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी ती रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी अंकुश मधुकर सुरवाडे (वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव) व एक विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेतले.सदर आरोपीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले होते. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ राहुल शिंपी करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या