पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जारगाव चौफुली परिसरात घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये इंधन म्हणून केला जात असल्याची माहिती पाचोरा पोलिसांना मिळाल्यानंतर १८ जुलै रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत शेख शहेबाज शफुद्दीन (रा. नुरानीनगर) याला अटक करण्यात आली आहे.
दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये गॅस भरताना पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडले. घटनास्थळी २१ घरगुती एलपीजी सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटर आणि इतर साहित्य असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.
गेल्या चार महिन्यांत ही या परिसरातील चौथी कारवाई असूनही, अशा प्रकारच्या अवैध गॅस विक्रीचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.