Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावपाचोरा पोलिसांची लागोपाठ दुसऱ्या दिवशी कारवाई; गावठी कट्टा जप्त करीत दोघांना अटक

पाचोरा पोलिसांची लागोपाठ दुसऱ्या दिवशी कारवाई; गावठी कट्टा जप्त करीत दोघांना अटक

पाचोरा/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरात पहिल्या दिवशी गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडल्याची कारवाई झाली तोच परत पाचोरा पोलिसांनी लागोपाठ कारवाई करीत पुन्हा दुसऱ्या दिवशी पूनगाव, ता.पाचोरा येथील तरुणांकडून गावठी कट्टा जप्त केल्याने अवैधरीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्यांच्या गोटात खळबळ माजली आहे. अटक झालेल्यात राहुल अनिल परदेशी (27) पूनगाव, ता.पाचोरा व रामचंद्र गोपीचंद परदेशी (34) पूनगाव, ता.पाचोरा अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री 11.30 वा.दरम्यान करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत पूनगावातील दोघा संशयितांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील, पोलीस हवालदार विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे आदींच्या पथकाने महादेव मंदिराजवळील पोल्ट्री फार्मजवळ संशयीतांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त केला. प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या