Friday, February 27, 2026
police dakshta logo
Homeक्राईमशहरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

शहरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेची आठवड्यातील सलग दुसरी कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे उघड करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राहुलकुमार पवार, पोलीस निरीक्षक, पाचोरा यांना शहरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमाबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली.माहितीनुसार जारगाव चौफुली, पाचोरा येथे एक तरुण धारदार लोखंडी तलवार हातात घेऊन फिरत असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक पवार यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी धाड टाकून सोमनाथ बना पाटील (वय १९, रा. हनुमान नगर, पाचोरा, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

याप्रकरणी पो.कॉ.योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलीस स्टेशनअंतर्गत शस्त्र अधिनियमांतर्गत आठवड्यातील ही सलग दुसरी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोका संदीप राजपूत, पो.का.जितेश पाटील, पो.का.योगेश पाटील व पो का.हरीश परदेशी यांच्या पथकाने केली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या