पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील बसस्थानक परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली. भरदिवसा अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला असून यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरासह संपूर्ण पाचोरा शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारामागे जुना वाद कारणीभूत असल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात काही वेळेसाठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
गोळी लागलेला युवक गंभीर जखमी अवस्थेत असून त्याला तत्काळ पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनेमागचं नेमकं कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहेत. दरम्यान, शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.