Sunday, September 8, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासेवाभावी संस्थांच्या नावाने बनावट पुरस्कार या बोगस संस्थाचालकांचे आणखी दुसरे गोरखधंदे काय?

सेवाभावी संस्थांच्या नावाने बनावट पुरस्कार या बोगस संस्थाचालकांचे आणखी दुसरे गोरखधंदे काय?

विशेष वृत्तांकन भाग नंबर 3,

पैसे द्या अंन पुरस्कार घ्या.

जळगाव,/विशेष वृत्तांकन/ पोलीस दक्षता लाईव्ह :- जसं सीजन तसं काम फक्त मिळाला पाहिजे दाम या हिशोबाने चालणारे बोगस सेवाभावी संस्थांचे बोगस संस्थाचालकांचे आणखी अनेक गोरखधंदे आहेत जे आता हळूहळू उघडकीस येणार असल्याचे समजते.

या संस्थाचालकांनी कशा कशा पद्धतीने लोकांना गंडविले आहे याचा देखील शोध घेणे सुरू आहे. या शोधाच्या माध्यमातून अनेकांच्या प्रतिक्रिया देखील उमटू लागले आहेत. एकदा एकाला गंडविले तर पुन्हा दुसरा शोधायचा आणि त्याला गंडवायच अशी यांची साखळी सुरू आहे. दरवर्षी सालाबदाप्रमाणे महिना बदलतो तसा यांचा लुबाडण्याचा गोरखधंदा देखील बदलत असतो.

सामाजिक कार्यात अग्रेसर मात्र डोक्याचा वापर कमी अशांच्या शोधात असलेले या बोगस संस्था अनेक वेळा जिल्हे तालुके बदलवत असतात. कोण आपल्या पकड मध्ये कसा येईल आपल्या जाड्यात त्याला कसा ओढता येईल त्या गोष्टीचा अभ्यास या बोगस संस्थाचालकांनी चांगला केला आहे. साधारण व्यक्ती यांच्या जाळ्यात सहज अडकु शकतो. अशाच व्यक्तीकडनं पुरस्काराच्या नावाने ते हजारो रुपये लुबाळत असतात. हा त्यांचा धंदाच आहे असे म्हणायला काही हरकत नाही. पुरस्काराचा हा एक प्रकारे धंदाच आता झाला. आता सीजन संपलं आता दुसरा धंदा काय? त्या धंद्याला देखील त्यांनी सुरुवात केली आहे.

क्रमशः 

पुढील मालिका भाग नंबर ४ लवकरच पोलीस दक्षता लाईव्ह वर…

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या