Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावशिवपुराण कथेला जळगावात सुरुवात; पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची उपस्थिती; ट्रॅफिक झाली प्रचंड...

शिवपुराण कथेला जळगावात सुरुवात; पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची उपस्थिती; ट्रॅफिक झाली प्रचंड जाम…!

लहान व्यक्ती होऊन जगण्यात खूप फायदा आहे तसेच माता,पिता, गुरु हेच खरे मार्गदर्शक: पंडित प्रदीप मिश्रा

पहिला दिवस शिवपुराण कथा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇

 

जळगाव/ तुषार वाघुळदे/कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव- लहान व्यक्ती होऊन जगण्यात खूप फायदा आहे तसेच -माता, पिता आणि गुरु हेच खरे व्यक्तीचे हितचिंतक असून वेळोवेळी तेच योग्य मार्ग दाखवीत असतात, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी आज जळगाव येथे केले. पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आजपासून वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभराच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी जळगावात दाखल झालेले आहेत. यातील बरेचसे भाविक कथास्थळी मुक्कामी आहेत.

जळगाव शहरात पंडित मिश्रा यांच्या कथेचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेली कथा ११ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. कथा सुरू झाल्याने जळगावात सर्वत्र या कथेची चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. पंडित मिश्रा म्हणाले की, लहान व्यक्ती होऊन जगण्यात खूप फायदा आहे. लहान झाल्यास आनंद खूप मिळू शकतो. चार गोष्टी करताना कधीही थकू नये. देवाचे नाव घेताना, विद्या ग्रहण करताना थकून चालणार नाही. तसेच दानधर्म करताना देखील थकू नये. याचबरोबर शिवपुराण कथा शहरात अथवा जवळपास असल्यास ती ऐकण्यासाठी जाण्यास थकू नये. सनातन धर्म मजबूत झाला पाहिजे असे सांगून ते म्हणाले की,आपल्या धर्मात राहून धर्म मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अहिल्याबाई होळकर आणि जिजाबाई यांची शिवभक्ती प्रेरणादायी होती. महादेव भोळा असून तात्काळ पावणारा आहे. महादेवाची उपासना फलदायीच ठरते.

भाविकांच्या प्रचंड गर्दीने ” ट्रॅफिक जाम “….!!

प्रसिध्द कथा व प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या बडे जटाधारी मंदिर परिसरात आजपासून सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. तर, भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली असून हजारो भाविक यात अडकून पडले होते.
पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्याच कथेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.जळगाव तालुक्यातील बडे जटाधारी मंदिर परिसरातील भव्य मंडपात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथा सुरू झाली तेव्हा उपस्थित लक्षावधी आबालवृध्द भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आजच्या निरूपणात शिव महापुराण कथेची प्रस्तावना करतांनाच काही भक्तांचे अनुभव हे त्यांनी पाठविलेल्या पत्रांचे वाचन करून सांगितले. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या पत्रांनाच त्यांनी स्थान दिले. कथेच्या पहिल्या दिवशीच मंडप अपूर्ण पडल्यामुळे असंख्य भाविकांनी बाहेर बसूनच कथेचे श्रवण केले.सायंकाळी बरोबर पाच वाजता कथेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. शेवटी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह कथेचे आयोजक भरत चौधरी, जगदीश चौधरी व तुषार चौधरी तसेच मोजक्या मान्यवरांना व्यासपीठावर निमंत्रीत करून आरती करण्यात आली. यानंतर कथेसाठी आलेले भाविक कथा स्थळावरून निघाले.

दरम्यान, आरती होण्याआधीच अनेक भाविकांनी मंडप सोडून बाहेर प्रयाण केले. तरीही वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेष करून आव्हाणे फाटा मार्गाने जळगावकडे येणार्‍या बसेस तसेच अन्य वाहनांमुळे अक्षरश: हा रस्ता गच्च भरून गेला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या