Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025...

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 सुरु..

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नैसर्गिक आपत्ती, पावसाअभावी नुकसान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 लागू केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२५ ही अंतिम तारीख आहे.

या योजनेचा लाभ जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र सहभागी होण्यासाठी agristack नोंदणी क्रमांक व ई पीक पाहणी आवश्यक आहे.

अधिसूचित पिकांची यादी:
यामध्ये भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस आणि कांदा या पिकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या अटी:
ई-पिक पाहणी व विमा घेतलेले पीक वेगळे आढळल्यास विमा अर्ज रद्द केला जाईल.

विमा हप्ता व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त शुल्क CSC केंद्रांना देणे बंधनकारक नाही.

बोगस अर्ज करणाऱ्यांवर कारवाई होणार असून त्यांना ५ वर्षे काळ्या यादीत टाकले जाईल.

विमा हप्ता थेट शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सूचना:
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी agristack क्रमांक, ७/१२, बँक पासबुक, आधार कार्ड आणि स्वयंघोषणापत्रासह बँक किंवा CSC केंद्रात जावून अर्ज करावा. तसेच www.pmfby.gov.in या पोर्टलवरूनही ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.

विमा कंपनी:
या योजनेची अंमलबजावणी AIC (Agriculture Insurance Company of India Ltd.) मार्फत केली जात आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी किंवा हेल्पलाईन क्रमांक १४४४७ वर संपर्क साधावा.

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना विनंती केली आहे की, शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही संधी वाया जाऊ न देता तात्काळ सहभागी व्हावे..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या