Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमपारोळा पोलीस उपनिरीक्षक ८ हजाराची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

पारोळा पोलीस उपनिरीक्षक ८ हजाराची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- ८ हजाराची लाच घेतांना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील यांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. नातेवाईकांसह तक्रारदारास अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ही रक्कम घेतली. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारोळा पोलीस स्टेशन येथे तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील (वय- ५४ ) वर्ष यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली. यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपये घेतले. उर्वरित १० हजार नंतर देऊ असे ठरले.दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली असल्याने मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी सापळा रचला. यात तक्रारदाकडून तडजोडअंती ८ हजारा रूपये स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील याना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पारोळा पोलीस स्टेशनला या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.ह. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. किशोर महाजन, पो.ना सुनिल वानखेडे, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या