पारोळा/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- पारोळा शहरातील वंजारी शिवारा लगत असलेल्या पारोळा शहरातील भोई समाजाची स्मशानभूमी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वापरात येत होती. या जमिनीचा कागदोपत्री दस्तावेजांवर देखील सन २०२१ अखेरपर्यंत स्मशानभूमी असा उल्लेख होता. परंतू गेल्या १ ते २ वर्षापूर्वी या जमिनीसंदर्भात कुणालाही विश्वासात न घेता परस्पर वल्फ बोर्डाच्या नावे करण्यात आली.ही बाब गेल्या दोन दिवसांपूर्वी भोई समाजाचा समाज बांधवांनी कळली.या बांधवांनी त्वरित याची दखल घेत न्यायासाठी आमदार चिमणराव पाटील आणि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांची भेट घेवून सदरील प्रकरण मांडले.
या प्रकरणाची अमोल पाटील यांनी दखल घेत आज शहरातील हिंदू संघटना, भोई समाज बांधव यांचेसह म.तहसिलदार डाॕ.उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांची भेट घेतली.या प्रकरणाबाबत श्री.पाटील उपस्थित तहसिलदार व पोलीस निरिक्षक यांच्या लक्षात आणून दिली. याबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीत या घटनेचा लढा न्याय प्रक्रियेनेच लढता येईल असे लक्षात आले.
या लढ्यानेच सदरील जागा ही पूर्ववत भोई समाजाच्या वापरासाठी उपयोगात येवू शकते. यासाठी सदरील न्याय प्रक्रीया ही अत्यंत बारकाईने करून वेळोवेळी या प्रकरणाबाबत जातीने लक्ष घालून न्याय प्रक्रीयेस येणारे हे अर्थसहाय्य देखील मी वैयक्तिक स्वरूपात करून समाजाला न्याय कसा मिळवून देता येईल, याबाबत काम करणार असल्याचे अमोल पाटील यांनी उपस्थित बांधवांना ठोस आश्वासित केले. याप्रसंगी उद्योजक तथा विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी छोटू दाणेज, माजी नगरसेवक राजु कासार, भोई समाज अध्यक्ष दशरथ भोई, रवी भोई, गोरक्षक नितीन बारी, घनःशाम ठाकरे, अमोल पाटील यांचेसह हिंदू संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, भोई समाज पंचमंडळ आणि समाज बांधव उपस्थित होते.