Sunday, March 15, 2026
police dakshta logo
Homeजळगावपशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या हक्कांसाठी झटणारे डॉ. नारायण जोशी यांचे निधन

पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या हक्कांसाठी झटणारे डॉ. नारायण जोशी यांचे निधन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे तसेच पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. नारायण जोशी यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पशुवैद्यकीय क्षेत्रातील एक खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

डॉ.जोशी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पशुवैद्यकीय पदविकाधारकांना समाजात योग्य मान-सन्मान मिळावा, तसेच त्यांच्या खाजगी पशुवैद्यकीय सेवेला शासन व समाजाकडून मान्यता मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या उद्दिष्टासाठी त्यांनी संघटनात्मक पातळीवर काम करत अनेक प्रश्न मांडले आणि पदविकाधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा दिला.वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी या क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत त्यांच्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या निधनाने या क्षेत्राचा एक आधारवड हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, डॉ.जोशी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी आता सर्व पशुवैद्यकीय पदविकाधारकांची असल्याची भावना संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली.समस्त पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ, जळगाव जिल्हा यांच्या वतीने डॉ.नारायण जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या