जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- बाहेर परमहिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून पती- पत्नीत कडाक्याचे भांडण होऊन हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विवाहितेने थेट पोलीस ठाण्यात कैफियत दिल्यावरून पोलीस पतीविरूध्द अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली.पत्नीने पतीवर संशय व्यक्त केलेले व्यक्ती हे पोलीस आहेत, ते ‘मुख्यालयात कार्यरत आहेत. ते एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. पतीचे बाहेर महिलेशी संबंध असल्याची कुणकुण त्यांच्या पत्नीला लागली. या प्रकाराचा छडा लावण्याच्या निर्धारातून त्यांनी थेट पतीला अनेकविध प्रश्न केले.आरोपीच्या पिंजऱ्यात पतीला उभे करत पोलिसी थाटात पत्नीने खरं-खोटं काय ? अशी विचारणा केली. दाम्पत्यात वाद चांगला वाढला. तू-तू .. मै मै.. यातून सुरू झाले. संयम सुटल्याने पोलीस पतीने पत्नीला शिव्या दिल्या. मारहाण करून पत्नीला मारण्याची धमकीही दिली. यामुळे संतप्त पोलीस पत्नीने थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. पोलीस पत्नीने पोलीस पती, सासू सासरे यांच्याविरूध्द तक्रार दिली. यासंदर्भात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पती- पत्नीत कडाक्याचे भांडण; पतीचे पर महिलेशी संबंध असल्याचा पत्नीला संशय
RELATED ARTICLES

