Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमस्वयंपाकाच्या वादातून पतीचा पत्नीवर विळ्याने वार

स्वयंपाकाच्या वादातून पतीचा पत्नीवर विळ्याने वार

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या परिवारात स्वयंपाक करण्याच्या कारणाने उद्भभवलेल्या वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना अशी घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, आपल्याच पत्नीवर विळ्याने वार करणारा पती सुभाष शंकर उमाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा आपल्या पत्नी मंगला उमाळे (वय-३४) यांच्या सोबत राहत असतो. घटना घडली त्या दिवशी शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मंगला उमाळे या महिला कामावरून घरी आली. त्यावेळी तिचे पती सुभाष उमाळे हे घरीच होते. पती सुभाष उमाळे याने पत्नीला स्वयंपाक करण्यास सांगितला. दरम्यान मी आताच कामावरून आली असून थकलीआहे थोड्या वेळाने स्वयंपाक करते असे पत्नी मंगला यांनी सांगितले. मला तू उलट बोलते म्हणत याचा राग आल्याने सुभाष उमाळे याने त्याच्या हातात विळा घेत त्याची पत्नी मंगला हिच्या उजव्या कानावर वार करत जखमी केले. ही घटना घडल्यानंतर हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांना माहीत पडली. मंगला उमाळे यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती सुभाष शंकर उमाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या