नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पेठ भागातील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार असल्याची माहिती नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील व उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी दिली आहे.या घटनेमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत तात्पुरता अडथळा निर्माण झाला असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा कमी व योग्य वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी केले केले आहे.तसेच, या काळात नागरिकांनी संयम बाळगून नगरपरिषदेला सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

