जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्हा पोलीस व समाज यांच्यामध्ये समन्वय साधून समाज हित लक्षात घेऊन पोलीस दलास समाजामध्ये सन्मान मिळवून समाजाला व पोलीस दलाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच वाटचालीमध्ये तत्परता ठेऊन पोलीस दलाला सहकार्य करण्यासाठी पोलीस दक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विक्रांत गजानन पवार यांनी मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांची पोलीस दक्षता समिती जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धीरज वसंत ठाकुर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यावर झालेल्या या नियुक्ती बाबत मुविकोराज कोल्हे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पोलीस दक्षता लाईव्ह टीम च्या प्रतिनिधीशी संवाद साधत समितीचे ध्येय, नीती यांचे पालन करून,आपल्या पदाच्या कार्यकाळात सर्वांना अपेक्षित न्याय देण्याचा प्रयत्न करेल, तसेच समिती वाढीसाठी सदैव कार्यतत्पर राहील असे सांगितले. त्यांच्या या नियुक्ती बाबत समाज माध्यमातून व मित्र परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.